आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:बालकल्याण सभापतींचीच मनपात आंदोलनाची तयारी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संघमा चाैकातील अतिक्रमण काढण्याबाबत तक्रार करूनही उपयोग झाला नाही. अतिक्रमण काढण्याबाबत आठ दिवसांत निर्णय झाला नाही तर महापालिकेच्या प्रवेशद्वारासमाेर मंगळवारपासून (दि.१३) पासून उपाेषणाला बसू, असा इशारा सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती याेगिता बागूल यांनी दिला आहे.

याविषयी त्यांनी आयुक्त देविदास टेकाळे यांना निवेदन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संघमा चाैकातील अतिक्रमण काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर अतिक्रमण काढण्याबाबत बांधकाम विभागाकडून नाेटीस देण्यात आली आहे. त्यानंतरही महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढलेले नाही. याविषयी संघमा युवा मंचाचे पदाधिकारी, नागरिकांनी निवेदन दिले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत टाळाटाळ केली जाते आहे. आठ दिवसांत अतिक्रमण काढले नाही तर समर्थकांसह १३ सप्टेंबरपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमाेर उपाेषणाला बसू असा इशारा सभापती बागूल यांनी दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या भूमिककडे आता लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...