आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला मेळावा:भाजपच्या चित्रा वाघ आज येणार शहरात

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.४) दुपारी २.३० वाजता राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात महिला मेळावा हाेणार आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मायादेवी परदेशी यांनी ही माहिती दिली. तसेच मालेगाव येथेही मेळावा होणार आहे.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बैठक झाली. भाजप महिला माेर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी महापाैर जयश्री अहिरराव अध्यक्षस्थानी हाेत्या. या वेळी भाजप महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मायादेवी परदेशी, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती धरती देवरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...