आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी उत्सव:बोरदसह परिसरातील 45 गावांतील‎ नागरिकांची भोंगऱ्या बाजारात हजेरी‎

बोरद‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर‎ तळोदा तालुक्यातील बोरद येथे‎ सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक‎ भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला‎ होता. आदिवासी बांधवांचा‎ वर्षातील महत्त्वपूर्ण बाजार म्हणजे‎ भोंगऱ्या बाजार हा असतो. त्यामुळे‎ मोठ्या उत्साहात बोरद येथे हा‎ बाजार यावर्षीही भरला. दरम्यान,‎ दुपारी पावणेचार वाजता पावसाने‎ तुरळक हजेरी लावल्याने‎ व्यावसायिकांची तारांबळ उडाली.‎ भोंगऱ्या बाजार सुरू‎ होण्याअगोदर गावागावातून येणारे‎ शेकडो आदिवासी बांधव बोरद‎ गावात दाखल झाले होते.‎ त्याचबरोबर मोठ्या उत्साहात‎ असलेल्या आदिवासी बांधवांनी‎ ढोल, मांडळ व बिरीसह डफच्या‎ तालावर बेफान नृत्य करत रंगत‎ आणली होती. भोंगऱ्या बाजारासाठी‎ सकाळपासून आदिवासी बांधव व‎ विशेषतः महिला वर्ग मोठ्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रमाणावर बोरद येथे दाखल होत‎ होते.

बाजार सुरू होण्यापूर्वी‎ बाजारात ढोल तालावर नाचत होते.‎ बासरीच्या तालावर ते नृत्य करत‎ होते. आदिवासी संस्कृतीचे जतन‎ करत आदिवासी बांधव शिस्तबद्ध‎ पद्धतीने सर्व नृत्यामध्ये सामील होत‎ होते. या भोंगऱ्या बाजारात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सातपुड्यातील दऱ्या खोऱ्यातील‎ सर्व ४५ गावांतील आदिवासी बांधव‎ हजेरी लावत होते. होळीला‎ लागणाऱ्या साहित्याची खरेदी करीत‎ होते. पोलिस प्रशासनातर्फे बंदोबस्त‎ ठेवण्यात आला होता. यावेळी‎ सरपंच यांचे पती रवीन भिलाव,‎ ग्रामपंचायत सदस्य साजन शेवाळे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गौतम भिलाव, संतोष ढोडरे, मंगेश‎ पाटील, विनोद शेवाळे तंटामुक्तीचे‎ अध्यक्ष सन्या शेवाळे, कांतिलाल‎ ठाकरे, संजय ठाकरे, पेसा सदस्य‎ पोलिस पाटील बाबूराव ढोडरे,‎ त्याचबरोबर माजी जिल्हा परिषदेचे‎ सदस्य नरहर ठाकरे हे बाजारात तळ‎ ठोकून होते.‎

बोरद येथील भोंगऱ्या बाजारात साहित्याची खरेदी करताना आदिवासी बांधव.‎ भोंगऱ्या बाजारात तरुणाईची टॅटूला पसंती‎ महिला वर्गाच्या बांगड्यांची दुकाने विशेष आकर्षण ठरत होती. चपलांचे‎ दुकाने, त्याचबरोबर मनोरंजनासाठी मौत का कुवा, जंतर-मंतर असे खेळ‎ दाखल झाले होते. तरुण मुले, मुली हातावर टॅटू काढत होते. थंडपेयची दुकाने‎ थाटली होती. बोरद महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश तिन्ही राज्याच्या सीमेवर‎ वसलेले असल्याने भोंगऱ्या बाजाराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते.‎

संसारोपयोगी साहित्याची‎ करण्यात आली खरेदी‎ भोंगऱ्या बाजाराच्या पार्श्वभूमीवर‎ शहरातील बाजारपेठेत‎ खाद्यपदार्थाच्या दुकानासह विविध‎ पूजेचे साहित्य, कपडे व लहान‎ मुलांची खेळणी असलेली दुकाने‎ सजली होती. महिलांकडून खोबरे,‎ हार, कंगण, खारीक, खजूर,‎ दाळ्या, गूळ, या विविध साहित्याची‎ मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात‎ होती बाजारात विविध संसाराेपयाेगी‎ साहित्याची मोठी दुकाने थाटलेली‎ होती. विविध खाद्यपदार्थाची दुकाने‎ लावण्यात आली होती.‎

बातम्या आणखी आहेत...