आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा‎:नवापूर तालुक्यात रंगले दावे- प्रतिदावे‎

नवापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा‎ निकाल जाहीर झाला आहे. यापैकी‎ गंगापूर ग्रामपंचायत बिनविरोध‎ झाली होती. त्यावर काँग्रेस पक्षाने‎ दावा केला असून, उर्वरित १५‎ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस पक्षाचे‎ आमदार शिरीषकुमार नाईक यांनी‎ दहा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा‎ केला.

दुसरीकडे भाजप‎ तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी नऊ‎ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.‎ नवापूर तालुक्यातील सरपंच‎ खेकडा- सरपंच- अमिशा‎ मावची (अपक्ष), पाटी- रशिला‎ वळवी (अपक्ष), करंजवेल-‎ इल्पेश वसावे (अपक्ष)‎ नानगीपाडा- पल्लवी गावित‎ (भाजप), वाटवी (खांडबारा)‎ अरुणा विलास कोकणी (काँग्रेस),‎ शेही- संगीता कोकणी (अपक्ष),‎ भांगरपाडा- यशोदा पाडवी‎ (काँग्रेस), अंठीपाडा- जयदीप‎ मगन वसावे (रा.काँ), वावडी-‎ बाजूबाई भूपेंद्र वसावे (काँग्रेस),‎ बेडकी- निर्मला गावित (अपक्ष),‎ वाटवी (नवागाव)- वता वळवी‎ (अपक्ष), विसरवाडी - यशस्विनी‎ गावित (बाळासाहेबांची शिवसेना),‎ खडकी- शिल्पा गावित (भाजप),‎ शेवगे- रमिला करणसिंग पाडवी‎ (अपक्ष), वऱ्हाडीपाडा- दलपत‎ अर्जुन वसावे (अपक्ष), गंगापूर -‎ निकिता शैलेश वसावे (काँग्रेस‎ बिनविरोध)‎

विसरवाडीत गड आला‎ पण सिंह गेला‎ विसरवाडी ग्रामपंचायतीत‎ बाळासाहेबांची शिवसेना शिंदे‎ गटाचे १५ पैकी १४ उमेदवार निवडून‎ आले असले तरी यंदाच्या‎ निवडणुकीचे पॅनल प्रमुख‎ विसरवाडी माजी सरपंच बकाराम‎ गावित शिंदे गट तालुका प्रमुख हे‎ एकमेव प्रमुख उमेदवार ३८ मतांनी‎ पराभूत झाले.तर मुलगा आणि‎ लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार‎ सूनबाई निवडून आल्याचा आनंद‎ आहे. एकाच घरामध्ये विजय आणि‎ पराजय बघावयास मिळत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...