आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिरपुरात दोन गटांत हाणामारी; ३५ जणांवर दंगलीचा गुन्हा

शिरपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कॅफे चालवणाऱ्या एका तरुणाकडे मागितलेला हप्ता दिला नाही म्हणून त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी महात्मा फुले हायस्कूलसमोर घडली. पोलिसांत तक्रार दिल्याने १६ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यात चौघे जखमी झाले असून, तिघांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. तर विरोधी गटाने दिलेल्या तक्रारीनुसार १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या मारहाणीत दुसऱ्या गटाचे दोन जण जखमी झाले आहेत.

सिद्धार्थ नगरात राहणारा प्रितेश उर्फ चंकी कैलास बोरसे कॅफे चालवतो. त्याच्याकडे हप्ता देण्याची मागणी केली. यावरून मंगळ‌वारी महात्मा फुले हायस्कूलसमोर त्याच्यावर हल्ला केला. मदतीला आलेल्या राहुल प्रकाश शेटे, बिरबल कैलास बोरसे, कल्पेश कैलास बोरसे यांनाही मारहाण करीत सोन्याची चैन हिसकावून घतली. याप्रकरणी अतुल ब्राम्हणे, सिद्धार्थ कढरे, प्रकाश कढरे, हंसराज उर्फ हक्शा कढरे, गणेश उर्फ आबा दौलत चौधरी, आनंद दौलत चौधरी, दुर्गेश उर्फ मुन्ना माळी, चेतन चौधरी, संदीप उर्फ सोनू माळी, प्रसाद सुतार, भूषण थोरात, अविनाश थोरात, विशाल प्रकाश शिरसाठ, सागर प्रकाश शिरसाठ, सिद्धार्थ थोरात व अमन शकील पिंजारी अशा १६ जणांवर खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास या गुन्ह्याची नोंद होताच तपास पीएसआय गणेश कुटे यांना सोपवला असता त्यांनी संशयितांपैकी प्रसाद सुतार, भूषण थोरात व अमन पिंजारी या तिघांना ताब्यात घेतले आहे.

संशयितांचा शोध सुरू आहे. तर सिद्धार्थ कढरे या सेतू चालकाच्या तक्रारीनुसार लकी उर्फ लखन खाटीक, सनी पाटील, सिद्धार्थ करनकाळ,चंदू वाघ, सुयश ठाकरे, योगेश शिरसाठ, चेतन चौधरी, भूपेश पाटील, आसिफ खान, सुनील फाजगे, असलम खाटीक, हितेश पाटील, तुषार पाटील, चंकी उर्फ प्रितेश बोरसे, राहुल शेटे, कल्पेश कैलास बोरसे, निर्मल कैलास बोरसे, तुषार दिलीप चौधरी व दीपक बुवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...