आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य परिक्षा परीषदेतर्फे पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि आठवीसाठी झालेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा राज्यात दुसऱ्या तर पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत दहाव्या क्रमांकांवर आहे. जिल्ह्यातील २ हजार ९३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ हजार ३३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी ५ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यातून १ हजार ५८५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. ही टक्केवारी २७.५० असून जिल्हा राज्यात दहाव्या क्रमांकावर आहे. आठवीचे ६ हजार २२५ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी ५ हजार ८८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून १ हजार ३४९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून निकालाची टक्केवारी २२.९२ आहे. आठवीच्या निकालात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर कोल्हापूर आहे. परीक्षा परिषदेच्या निश्चित केलेल्या निकषानुसार तालुका आणि जिल्हा निहाय गुणवत्ता यादी प्रसिध्द झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळानिहाय अंतिम गुणपत्रक मिळेल. गेल्यावर्षापेक्षा यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे.
नियोजनामुळे चांगले फलित
शिष्यवृत्तीचे विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे यंदा निकाल वाएला आहे. -मोहन देसले, शिक्षणाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.