आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:स्वच्छ हाॅस्पिटल, शाळांना मिळेल बक्षीस‎

धुळे‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान‎ राबवण्यात येते आहे. या अभियानांतर्गत‎ स्वच्छ वाॅर्ड स्पर्धा घेण्यात येते आहे.‎ स्पर्धेत प्रत्येक प्रभागातील स्वच्छ हॉटेल,‎ हॉस्पिटल, शाळा, मार्केट, वसाहतीला‎ बक्षीस देण्यात येईल.‎ स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात‎ स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते‎ आहे. आेला व सुका कचरा वेगळा जमा‎ करण्याचा प्रयत्न होताे आहे.

तसेच काही‎ वसाहतीत घरस्तरावरच कचऱ्याची‎ विल्हेवाट लावली जाते आहे. तसेच‎ प्रत्येक प्रभागातील स्वच्छ हाॅटेल,‎ हॉस्पिटल, शाळा, वसाहत, मार्केटला‎ बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी‎ स्वच्छ वाॅर्ड स्पर्धा घेण्यात येते आहे.‎ त्यानुसार प्रत्येक प्रभागातील स्वच्छता‎ निरीक्षक संबंधित संस्थाची तपासणी‎ करता आहे. गुणांनुसार प्रथम, द्वितीय,‎ तृतीय बक्षीस दिले जाणार आहे.‎ स्वच्छता, पाण्याची सोय, अन्नपदार्थांची‎ गुणवत्ता, बायोमेडिकल कचरा विल्हेवाट‎ लावण्याची सोय, इन्फ्रास्ट्रक्चर आदींची‎ तपासणी होणार आहे. ही स्पर्धा १५०‎ गुणांची असून जास्त गुण मिळवणाऱ्या‎ संस्थेला बक्षीस दिले जाईल. विजेत्यांची‎ नाव पुढील आठवड्यात घोषित होण्याची‎ शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...