आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेखोरी:दोन दरवाजे तोडून हातसफाई ; आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे औषधांची नशेखोरी करणाऱ्यांच्या मागावर पोलिस असतांना दुसरीकडे शहरातील अभय कॉलेज परिसरातील श्रीकृष्ण नगरातील बंद घराचे दोन दरवाजे तोडून चोरट्यांनी रोकड व दागिने लांबवले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला. या प्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत बबिता पोपटराव सोनवणे (वय. ४६) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी दरवाजाचे कडी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा तोडून चोरटे लोखंडी कपाटापर्यंत पोहचले. या कपाटातून त्यांनी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, सुमारे २५ हजारांची रोकड आदी मुद्देमाल लांबवला. चोरीस गेलेला एकुण मुद्देमाल ४५ हजार आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवण्यास सुरूवात केली.

बातम्या आणखी आहेत...