आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:साक्रीरोड परिसरात चोरट्यांची हातसफाई

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साक्री रोडला लागून असलेल्या वसाहतीतील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबवला. हा प्रकार सोमवारी समोर आला. झेेंडे नगरातील प्लॉट क्रमांक २७ येथे बापू साने राहतात. ते न्यायालयातून निवृत्त झाले आहे.

पुतणीच्या साखरपुड्यासाठी ते कुटुंबासह सुरतला गेले होते. ही संधी चोरट्यांनी हेरत त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून चोरट्यांनी दागिने व राेकड लांबवली. हा प्रकार त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या नातलगांच्या लक्षात प्रकार आला. त्यानंतर साने कुटुंबीयांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलिस आले.

बातम्या आणखी आहेत...