आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाक्री तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचे विभाजन करून १४ ग्रामपंचायत करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या विभाजनास राज्य निवडणूक आयोगाकडूनही मंजुरी दिल्याची माहिती आमदार मंजुळा गावित यांनी दिली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील पश्चिम पट्ट्यातील पानखेडा, वाकी, देगांव, सुकापूर, कुडाशी, टेंभे प्र.वारसा, काकरदेया या सात ग्रामपंचातीचे विभागाच्या प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता १४ ग्रामपंचायती होणार आहेत. त्यात प्रामुख्याने मल्याचा पाडा, बोढरीपाडा, चिंचपाडा, गव्हाणीपाडा, होळ्याचापाडा, हारपाडा, पोहबारा, मोहळ्याचा पाडा, महुबंद पुणाजीनगर, जयराम नगर, शिवाजीनगर, राईनपाडा, हनुमंतपाडा या ग्रामपंचायतीची नव्याने स्थापना झाली आहे; परंतु राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या नवनिर्मित व निवडणूक रद्द केलेल्या ९ हजार ७७६ ग्रामपंचायत व २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समिती, निवडणूक यांच्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रभागाच्या भौगोलिक सीमा (प्रभाग रचना) निश्चितचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. तसेच राज्यात १४ महानगरपालिका व २०८ नगर परिषदा व ८ नगरपंचायती प्रभाग रचनेची प्रक्रिया चालू असल्याने सदर आदेशात स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापना, विभाजनाची कारवाई करण्यात येऊ नये, असे शासनाच्या पत्राच्या अनुषंगाने व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशित केले होते. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे विभाजन होणार किंवा कसे याबाबत संभ्रम निर्माण होता. त्यासंदर्भात आमदार मंजुळा गावीत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.