आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धन:पर्यावरणासाठी कापडी पिशव्या देणार

शिरपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलने पर्यावरण संवर्धनासाठी दोन हजार कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. या पिशव्यांचे माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या हस्ते विमोचन झाले.येथील आर. सी. पटेल मेन बिल्डिंगमधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांच्या हस्ते झाले.

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, स्कूल कमिटीचे चेअरमन योगेश भंडारी, माजी नगराध्यक्षा संगीता देवरे, सुभाष कुलकर्णी, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, स्कूलचे प्राचार्य डॉ. अमोल परब, प्राचार्या मनिषा अँड्रियाज, प्राचार्या मधुबाला राही, प्राचार्य निश्चल नायर, मुख्याध्यापिका स्मिता पंचभाई, गोकुळसिंग राजपूत आदी उपस्थित हाेते. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या विविध सामाजिक उपक्रमांसह सागर मित्रच्या पर्यावरणपूरक कार्याविषयीची माहिती डॉ. सुप्रिया पंतवैद्य व पौर्णिमा पाठक यांनी दिली. आर‌.सी. पटेल इंग्रजी माध्यमिक स्कूल कमिटीचे चेअरमन योगेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २ हजार कापडी पिशव्या तयार करण्यात आल्या आहे. त्यांचे प्रकाशन झाले. या वेळी भूपेश पटेल यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली.

बातम्या आणखी आहेत...