आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) नंदुरबार जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. लसीकरण व पोषण पुनर्वसन केंद्र आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे नंदुरबार दौ-यासाठी रवाना झाले. त्यांनी मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट दिली. यासोबतच जनतेला लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले. तसेच लॉकडाऊनचा पर्याय समोर असल्याचेही ते म्हणाले.
स्वत:हून पुढे येऊन कोरोना लस घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे. तसेच यानंतरही मास्क वापरावा. कोरोना लस कुठेही कमी पडणार नाहीत, संपूर्ण राज्यात लसीकरणाची केंद्र उघडली आहे. काही ठिकाणी केंद्र वाढवली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. ठिकठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये लसीकरणाची केंद्रे उभारली आहेत. यामुळे जे जे नियमात बसतात त्यांनी लसीकरणासाठी नाव नोंदवण्याचे आवाहान मुख्यमंत्र्यांनी केले.
...यामुळे पहिले नंदुरबारला गेले मुख्यमंत्री
मी स्वतः लस घेऊन तुमच्यासमोर उभा आहे. मी मुद्दामुन सर्वात पहिले तुमच्याकडे आलो आहे . हा दुर्गम भाग आहे. येथील बांधवांनी लस घेतली की, नाही त्यांच्याकडे सुविधा आहे की नाही, हे पाहण्यासाठी मी सर्वात पहिले इकडे आलो. कुणीही लसीला घाबरु नका. तसेच लस घेतली म्हणजे मास्क लावायचा असे होत नाही. लस घेतल्यानंतरही मास्क लावायचे आहे.
लॉकडाऊन करण्याचा विचार
राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे, लॉकडाऊनचा पर्याय दिसतो आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा विचार आहे. मात्र यापूर्वी जनतेने मला जसे सहकार्य केले तसे यावेळीही जनता करणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाने आपल्या देशात पाय टाकला तेव्हा आपल्या हातात काहीही नव्हते. आता व्हॅक्सीन आलेली आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवणे आणि त्याच बरोबरीने जनतेच्या मनात कोणत्याही शंका राहू नयेत. सर्वांनी स्वतःहून पुढे येऊन लस घ्यावी. मात्र लस घेतली तरीही नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
लसीकरणाचा आढावा
नंदुरबार कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी लसीकरण मोहिमेची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. लसीकरण केल्यानंतरही मास्क वापरणे , सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांना केले. मोलगी ग्रामीण रुग्णगलयात भेट दिल्यानंतर नागरिकांशी संवाद साधला. पोषण आहार केंद्रांची माहितीही त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी सुरवानी वीज उपकेंद्रांची पाहणी केली.
लस घेण्याचे आवाहन
नंदुरबार कोरोना लस पडून असल्याबाबत दिशाभूल केली जाते असून नियोजनाप्रमाणे लसीकरण करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धडगाव येथे स्पष्ट केले आहे. कोरोना लसीकरणाची मोहीम ग्रामीण भागात कशी सुरू आहे याचा आढावा मुख्यमंत्रांनी नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी आणि धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन घेतला. लॉकडाऊन चा पर्याय समोर दिसत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोना लसीचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे. बायोटेकची लस महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रस्ताव केंद्राला देणार असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. जनतेला पकडून आणून लस देत येणार नाही, त्यामुळे जनतेला आवाहन करतो लस सुरक्षित आहे, लसीकरण करून घ्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.