आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:20 फूट खाली कोसळी ; दुचाकी पुलावरून खाली कोसळल्याने दोन जखमी

खांडबारा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खांडबारा नजीक मोटारसायकल पुलावरून २० फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजू नाईक (वय २२), रा. विसरवाडी पाटी व सुकऱ्या गावीत (वय २५), रा.श्रावणी अशी या दोन्ही जखमींची नावे असून दाेघे मित्र आहेत. हे दोघे मित्र गुरुवारी चार वाजेच्या सुमारास श्रावणी येथून खांडबारा बाजारात कपडे खरेदीसाठी जात होते.

खांडबारा- श्रावणी दरम्यान मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाखाली कोसळली. त्यात संजू नाईक याला डोक्यासह हातापायाला गंभीर दुखापत झाली. तर त्याचा मित्र सुकऱ्या गावीत हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघात होताच आजूबाजूचे शेतकरी व वाहनधारकांनी वाहन थांबवून त्यांना मदत केली. ग्णवाहिकेतून दोघांना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...