आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा‎ अभियान:दुभाजकांना रंगरंगाेटी,‎ स्वच्छतेवर जनजागृती‎

धुळे‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे माझी वसुंधरा‎ अभियान राबवले जाते आहे. या‎ अभियानांतर्गत २४५ काेटींचा‎ डीपीअार मंजूर झाला आहे.‎ शहरातील प्रमुख चौक, दुभाजकांचे‎ सुशोभिकरण केले जाणार आहे.‎ त्यानुसार दुभाजक रंगवण्याच्या‎ कामाला प्रारंभ झाला आहे.‎ माझी वसुंधरा अभियानांतर्गत १‎ काेटींतून शहरात स्वच्छतेबाबत‎ प्रबाेधन करण्यात येणार अाहे.‎ यापूर्वी प्राप्त झालेल्या ३७ लाखांतून‎ रंगरंगाेटी करण्यासह‎ जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात‎ आले. तसेच आता पुन्हा २५ लाख‎ रुपये प्राप्त झाले आहे.

या निधीतून‎ शहरातील प्रमुख चाैक, रस्त्यावरील‎ दुभाजकांना रंग दिला जाणार आहे.‎ शहरातील प्रमुख ३० चाैक व‎ रस्त्यावरील दुभाजक,‎ जिल्हाधिकारी निवासस्थानाची‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संरक्षण भिंत, पाेलिस लाइन अाणि‎ शासकीय कार्यालयाच्या संरक्षण‎ भिंती रंगवून स्वच्छतेविषयी प्रबाेधन‎ करण्यात येणार अाहे. अायुक्त‎ देविदास टेकाळे, उपायुक्त विजय‎ सनेर, कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र‎ माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली‎ गुरूशिष्य स्मारकापासून कामाला‎ सुरुवात झाली आहे. हे काम‎ लवकरच पूर्ण करण्यात येणार‎ असल्याचे सांगण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...