आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:शिंदखेडा येथे रस्ता काँक्रिटीकरणास प्रारंभ; आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन

शिंदखेडा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महात्मा गांधी चौक ते हैदर अली चौक, तहसील कार्यालय ते गांधी चौक व राजेंद्र शिवदास देसले यांचे घर ते गांधी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

या वेळी नगराध्यक्षा रजनी वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, गटनेते अनिल वानखेडे, सभापती अनिता राजेश पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला बारकू पाटील, सुभाष माळी, अशोक देसले, प्रकाश चौधरी, दयाराम माळी, नगरसेवक अरुण देसले, विनोद पाटील, जितेंद्र जाधव, किसन सकट, चेतन परमार, भाजप ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दिपक चौधरी, रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादा मराठे, शहराध्यक्ष प्रवीण माळी, आर. एच. भामरे, गणेश मराठे, दगा चौधरी, रमेश भामरे, दिनेश सूर्यवंशी, बन्सीलाल बोरसे, मनीषा राकेश चौधरी, आशाबाई भगवान मराठे, सदाशिव पाटील, युवराज माळी, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे आदी उपस्थित होते. वि.का. सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार जयकुमार रावल म्हणाले की, शिंदखेडा शहरात विविध विकास काम करण्याचे नियोजन करून शहराला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...