आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आयुक्त गैरहजर; स्थायीची सभा तहकूब

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कचरा संकलनाचा ठेका वॉटरग्रेस कंपनीला दिला होता. तो काही महिन्यांपूर्वी रद्द झाला. आता या कंपनीने मनपाकडे कामाच्या मोबदल्यात पावणेदोन कोटींची मागणी केली आहे. या विषयासह अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेवर स्थायी समितीच्या सभेत चर्चा होणार असताना आयुक्त देविदास टेकाळे सभेला आले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत आयुक्तांच्या हजेरीत सभा घ्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली.

महापालिका सभागृहात गुरुवारी सभा झाली. समितीचे सभापती शीतल नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते. उपायुक्त डॉ.संगीता नांदुरकर, मुख्य कर निर्धारण अधिकारी पल्लवी शिरसाठ एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा सत्कार झाला. नगरसेवक संजय जाधव यांनी अण्णा भाऊ साठे घरकुल योजनेजवळील मनपाच्या व्यापारी संकुलाचा मुद्दा मांडला. त्यावर अभियंता कैलास शिंदे यांनी वसुली विभागाकडे गाळे काही दिवसांपूर्वीच हस्तांतरित केल्याचे सांगितले. यापूर्वी कचरा संकलनाचे काम करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीने मनपाकडे १ कोटी ७५ लाख रुपये मागितले आहे. याविषयावर सभेत चर्चा झाली. सहायक आरोग्याधिकारी राजेंद्र माईनकर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या पीएफपोटी वॉटरग्रेसकडे साडेचार कोटींची मागणी आहे. वाहन दुरुस्ती खर्च वेगळा असल्याचे ते म्हणाले. सभेला आयुक्त नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सभा तहकूब करावी, अशी मागणी केली. चर्चेनंतर सभापती नवले यांनी सभा तहकूब केली.

बातम्या आणखी आहेत...