आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा:112 अमृत सरोवरांच्या निर्मितीसाठी समिती गठीत, 20 ठिकाणी काम पूर्ण

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात ११२ अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी २० सरोवरांची निर्मिती पूर्णत्वास आली आहे. या ठिकाणी हर घर तिरंगा अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ध्वजारोहण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ जलाशय, तलाव निर्माण करणे किवा त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांनाच अमृत सरोवर असे म्हटले जाणार आहे. प्रत्येक सरोवर हे किमान एक एकर आकारमानाचे व किमान १० हजार क्यूबिक मीटर जलसाठा क्षमता निर्माण करणारे असेल. देशात ५० हजार अमृत सरोवरांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्ह्यात अमृत सरोवरांच्या निर्मितीसाठी जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी रवींद्र खोडे, जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सय्यद साजिद यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सहअध्यक्ष असल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील या ठिकाणी सरोवर झाले तयार
अभियानातंर्गत मंडाणे, निरगुडीपाडा, पाडळदे, नेर, वडेल, रावेर, धमाणे, काळखेडे, निमझरी, होळ (प्र. दे.), सोनगीर, सोनगीर, सोनगीर, मेहेरगाव, मेहेरगाव, हिंगोणे, अनाळे, चौगाव, अजनाळे, चौगाव येथे अमृत सरोवर तयार झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...