आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिल:मोबाइलच्या आहारी न जाता आई-वडिलांशी संवाद साधा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाने चंगळवादाचा त्याग करून कृतिशील जीवन जगावे. मोबाइलच्या आहारी जास्त न जाता आई-वडिलांशी रोज संवाद साधावा, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व महाविद्यालयीन करिअर कट्टातर्फे शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य व करिअर कट्टा समन्वयकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा करिअर कट्टाचे प्राचार्य प्रवर्तक डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे, प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे, तालुका समन्वयक डॉ. राजेंद्र ब्राह्मणे, जिल्हा समन्वयक डॉ. सचिन गोवर्धन आदींसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व करिअर कट्टाचे समन्वयक उपस्थित होते.

डॉ.यशवंत शितोळे म्हणाले की, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर कट्टातर्फे उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकन वाढीसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची तयारी ठेवली व नियोजन केले तर आयुष्यात यश मिळू शकते. तसेच राष्ट्रासाठी विधायक कार्य करण्याची ऊर्मी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या गुणांचा वापर करून करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. प्रा. डॉ. रवींद्र वाघ, प्रा. डॉ. संजय घोडसे, प्रा.डॉ.जितेंद्र तलवारे, प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रा.डॉ. दीपक चौधरी आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ.महेंद्र वाढे, प्रा. सतीलाल कंनोर, प्रा. प्रशांत वानखेडे आदींनी संयोजन केले.

राष्ट्रपुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा
प्राचार्य डॉ. मनोहर पाटील म्हणाले की, चांगल्या गोष्टी आत्मसात करून विद्यार्थ्यांनी मोठे व्हावे. राष्ट्रपुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असेही ते म्हणाले. प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे यांनी करिअर कट्टा उपक्रम आणि नॅक मूल्यांकनाविषयी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...