आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशीर्वचन:स्पर्धेतून इर्षा निर्माण होऊन द्वेष जन्माला येतो; द्वेशच शरीरातील ऊर्जा जाळून टाकतो ; आशीर्वचन : पोरवाड वाडीत आयोजित कार्यक्रमात ब्रजराजकुमार महाराज यांनी केले निरुपण

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पर्धेतून इर्षा निर्माण होते. यातून व्देश जन्माला येतो. हा व्देश आपल्या शरीरातील उर्जा जाळून टाकतो. ईश्वराला अशी लेकरे अजिबात आवडत नाहीत, असे आशीर्वचन प्रवचन वल्लभाचार्य पूपू १०८ ब्रजराजकुमार महाराज यांनी केले.

पोरवाड वाडीत आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी विनय श्रॉफ, डॉ. नूतन शाह, कौशिक शाह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ब्रजराजकुमार महाराज म्हणाले, पुष्टी मार्ग हा तापाचा मार्ग आहे. प्रतिक्षेचा मार्ग आहे. जेवढे आपण तापलो तेवढे आत्मा शुध्द होतो. जीवन जगतांना जेवढे ताप असेल तेवढे आपण तापून सलाखून बाहेर पडतो. भगवान श्रीकृष्णाला कोणता भक्त पसंत आहे? असा प्रश्न कुणी विचारला तर? भक्तचे लक्षण कुठले? आपण आपल्यालाच प्रश्न केला पाहिजे.

आपल्यातील दुर्गून फेकून दिले पाहिजे. निरअहंकारी माणूस देवाला आवडतो. जे व्देश रहित आहेत, ते ईश्वराला प्रिय आहेत. प्रतिस्पर्धेतून असुरूक्षितता निर्माण होते. इतरांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:ला स्पर्धक माना. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार सुख व दुखाची प्राप्ती मिळते. आपण आपल्या कामात कौशल्य निर्माण करण्यासाठी स्वत:च्या मेहनतीवर लक्ष द्या. शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. असे केल्यास प्रतिस्पर्धी अजिबात टिकणार नाहीत. दुसऱ्याची प्रगती पाहून जळू नका. त्यापेक्षा आपल्या कामांवर लक्ष ठेवा. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे आपले म्हणणे सर्वांना आवडेलच असे नाही.

भगवान श्रीकृष्णालाही जरासंधाने भटकायला लावले. आपण तर माणसे आहोत. त्यामुळे सकारात्मक विचार करावा. व्देष आणि क्रोध ही दोन्ही बाबी स्वत:ला दुखी करणाऱ्या आहेत. मित्रांपेक्षा शत्रुच अधिक आठवतात. कंसाला नेहमीच श्रीकृष्णच दिसायचे. कारण त्यांच्या मनात व्देश होता. परमेश्वराला व्देश किंवा प्रेमाने आठवण करा. तरीही परमेश्वर उध्दार करतात. व्देश भक्तीमार्गासाठी हानीकारक आहे. दुसऱ्याच्या आनंदात आपण दुखी होणे व दुसऱ्यांच्या सुखात आपण दुखी असाल तर आपण सर्वात धोकेदायक वीष पित आहोत, असे समजावे, असेही महाराज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...