आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छळाची तक्रार:एकाच दिवसात 6 विवाहितांकडून छळाची तक्रार, 29 जणांवर गुन्हा दाखल

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात एकाच दिवशी ६ विवाहितांनी सासरच्या मंडळींविरुद्ध छळ केल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत सहा पतींसह एकूण २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शहरातील साक्री रोड परिसरात माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीत पती राहुल दिनेश भामरे (रा. बालाजीनगर, नकाणे रोड) चारित्र्याचा संशय घेतात, असे नमूद आहे. शिंदखेडा येथील ३० वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार सुरत येथे राहणाऱ्या पती हितेश दिलीप चौधरी, दिलीप भगवान चौधरी, पुष्पाबाई दिलीप चौधरीने छळ केला.