आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान आवास योजनेअतंर्गत गेल्यावर्षी ड यादी व १६ हजार ४१६ घरकुल मंजूर झाले. त्यापैकी तब्बल ९४ टक्के लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला. तसेच वर्षभरात २ हजार ९९ लाभार्थ्यांचे घर पूर्ण झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी ड यादी प्रसिध्द करण्यात आली होती.
ड यादीनुसार १८ हजार ७५ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १६ हजार ४१६ लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झाली. त्यानंतर सात दिवसात १५ हजार ३६१ लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली. आत्तापर्यंत २ हजार ९९ घरकुल पूर्ण झाली आहे. त्यात धुळे तालुक्यात २७९, साक्री तालुक्यात ७५२, शिंदखेडा तालुक्यात ५३४, शिरपूर तालुक्यात १८६ घरकुलांचा समावेश आहे. घरकुल पूर्ण करण्यात शिंदखेडा तालुका आघाडीवर आहे. ड यादीतील १४ हजार ३१७ घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
राज्यात सहाव्या क्रमांक
सन २०२१-२२ या वर्षात घरकुल मंजुरीत जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १६ हजार ४१६ घरकुल मंजुर झाले आहे. तसेच सन २०१६ पासून आतापर्यंत ४३ हजार ४१३ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.