आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद कौशल्य:एकाग्रता शिबिरात संवाद कौशल्यासह नेतृत्व, मार्केटिंग, तत्त्वांवरही मार्गदर्शन

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एसव्हीकेएम, एनएमआयएमएस स्कूल ऑफ कॉमर्सतर्फे नऊ दिवसीय उन्हाळी एकाग्रता शिबिर घेण्यात आले. शिबिरात माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधुनिक आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणाची सखोल माहिती देण्यात आली. तसेच चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन, संघ बांधणीची मूल्ये, नेतृत्व आणि प्रभावी संवाद कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी काय करावे हे सांगण्यात आले. शहरातील एसव्हीकेएम संचलित एनएमआयएमएस स्कूल ऑफ कॉमर्स येथे हे शिबिर झाले. स्कूल ऑफ कॉमर्सचे प्रभारी असोसिएट डीन सीए कुणाल पसारी, प्रा. राजेंद्र अग्रवाल, डॉ. आस्था शर्मा, सीए पूजा सदाने, अनघा तायडे, नेहा तनेजा, सीए हृदेश पानखानिया, सीए अजय दवे यांनी सार्वजनिक भाषण-वादविवाद कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता आणि वेळ व्यवस्थापन, एमएस एक्सेल द्वारे डेटा विश्लेषण आणि डेटा व्हिज्युलायझेशन, व्यवस्थापन, वैयक्तिक वित्त आणि संपत्ती व्यवस्थापन, शेअर बाजार, बँकिंग, विमा परिचय, आधुनिक आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणाची सविस्तर माहिती, विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर विचार करणे, संघ बांधणी, नेतृत्व आणि प्रभावी संवादाची मूल्ये रुजवणे, बॉलिवूडद्वारे व्यवस्थापनाचे धडे, डिजिटल मार्केटिंग, करिअर बिल्डिंग, भारतीय प्राचीन ग्रंथ आणि धर्मग्रंथांच्या माध्यमातून मूल्यनिर्मिती, दैनंदिन जीवनातील चाणक्यनीतीचे तत्त्वे, भावनिक बुद्धिमत्ता आणि वेळ व्यवस्थापन, करिअर समुपदेशन (कौन्सिलिंग) या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. श्रुती पसारी, मेघा गिंदोडिया, डॉ.बरखा बाफना यांनी सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी), कॅनव्हास पेंटिंग व स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी या विषयावर विशेष सत्र घेतले. मेहुल वोरा यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल कसे तयार करावे, व्हिडिओ एडिटिंग कसे करावे याविषयावर माहिती दिली. शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी झुंबा व योगाचे प्रशिक्षण हितेश राजपूत व ध्वनी शहा यांनी दिले. तसेच एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...