आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा नाही:महिना उलटूनही आरक्षण जाहीर न झाल्यामुळे महापौरपदाचा संभ्रमच; विधी व न्याय विभागाकडूनही प्रतीक्षा

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे महापालिकेचे महापौर पदाबाबत न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. त्यापूर्वीच विद्यमान महापौर प्रदीप कर्पे यांनी पदाचा राजीनामा दिला. परंतु न्यायालयाचा निर्णय हौऊन महिला झाला तरी अद्यापही आरक्षणाबाबत कौणताही निर्णय झालेला नाही. याबाबत महापालिकेकडून विधी व न्याय विभागाकडूनही याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले हौते. मात्र अद्यापपर्यंत विधी व न्याय विभागाकडून मार्गदर्शनाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. महापौरपद ओबीसी सर्वसाधारण पदासाठी राखीव झाल्यानंतर त्यावर भाजपचे प्रदीप कर्पे यांची निवड केली होती.

मात्र यासंदर्भात गणेश निकम यांनी न्यायालयात अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाले नसल्याने एस.सी.साठी महापौरपदाची संधी मिळावी, अशी विनंती केली होती. त्यावर कामकाज होवून न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच प्रदीप कर्पे यांनी राजीनामा दिला होता. तर १७ मे रोजी न्यायालयाकडून निकाल देवून शासनाला महापौर आरक्षणाबाबत सूचना केल्या हाेत्या. निकाल लागून महिना होईल. मात्र अद्यापपर्यंत महापौरपदाच्या आरक्षणाबाबत निर्णय होवू शकलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...