आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योगपती अदानी यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसह एलआयसी कार्यालयासमोर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदाेलन करण्यात आले. गाेरगरिबांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या अदानींविषयीच्या अहवालाची संसदीय समितीतर्फे चाैकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनात भा.ई. नगराळे, माजी खासदार बापू चाैरे, डी. एस. अहिरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, अनिल भामरे, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, डाॅ. दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे रितेश पाटील, महेश घुगे, साबीर शेख, प्रमाेद सिसाेदे, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, अर्चना पाटील, साेमनाथ पाटील, बापू खैरनार, आनंदा पाटील, डाॅ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील, दिलीप शिंदे, पीतांबर महाले, छाेटू चाैधरी, के. डी. पाटील, राजेंद्र शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अरूण पाटील, साक्रीचे दीपक साळुंखे, राजीव पाटील, रतीलाल पाटील, संदीप पाटील, शिवाजी अहिरे, राजेंद्र खैरनार, आबा शिंदे, भानुदास गांगुर्डे, दीपक पाटील आदी सहभागी झाले होते.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माेदी सरकारकडून निवडक उद्याेगपतींवर मेहरबानी केली जाते आहे. त्यामुळे सामान्यांचा पैसा धाेक्यात आला आहे. अदानी उद्याेग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक व सार्वजनिक वित्तीय संस्थांना काेट्यावधी रूपये गुंतवण्यास केंद्र सरकारने भाग पाडले. त्यामुळे एलआरसी, स्टेट बँकेत सर्वसामान्य खातेदारांनी गुंतवलेल्या पैसा परत मिळेल का याबाबत भीती निर्माण झाली आहे. चुकीच्या निर्णयामुळे विमाधारक व गुंतवणूकदाराचे ३३ हजार काेटी रूपयांचे नुकसान झाले आहे. काँग्रेस उद्याेगपतींच्या विराेधात नाही.
पण साामन्य जनतेसोबत आहे. त्यामुळे अदानी समुहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वाेच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशामार्फेत चाैकशी करण्यात यावी, याविषयावर संसदेत चर्चा करावी, गुंतवणूकदारांच्या पैशाला संरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी आमदार कुणाल पाटील यांनी चर्चा केली.
संसदेत चर्चा व्हावी
केंद्र सरकारच्या दबावामुळे एलआयसी, स्टेट बँकेने अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली.मात्र, हा सर्वसामान्यांचा पैसा आहे.त्यांना पैसा परत मिळाला पाहिजे.अदानी ग्रुपच्या चाैकशीसाठी स्वतंत्र समिमी नेमावी. याविषयावरसंसदे त चर्चा करावी. अन्यथा काँग्रेस आंदाेलन करेल. -कुणाल पाटील,आमदार.
फलकांनी वेधले लक्ष
माेर्चा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आल्यानंतर त्याठिकाणी हमारा चाैकीदार चाेर है अशा प्रकारच्या घाेषणा देत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा निषेध करण्यात आला. तसेच आंदाेलनात सहभागी झालेल्यांनी हातात विविध फलक घेतले होते. त्यात भंवर ने खिलाया फुल,फुल काे ले गया हिडनबर्ग,२-जी का बडा घाटाेला है अदानी जी,ना खाऊंगा ना खाने देऊंगा,मगर अदानी काे पुरा देश लुटने दुंगा आदी फलकांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.