आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउर्जामंत्री नितीन राऊत नाशिक येथून धुळे मार्गे जळगाव येथे एका शासकीय कार्यक्रमासाठी जात होते. त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री राऊत यांचा सत्कार केला. या वेळी मंत्री राऊत यांनी काँग्रेसचे संघटन मजबूत करावे, असे आवाहन केले.
या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करनकाळ, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहरध्यक्ष प्रा.शरद पाटील, मनपातील माजी विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, अश्विनी पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण पाटील, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे महेश मिस्त्री, बापू खैरनार, शकील अहमद, रावसाहेब पाटील, राजीव पाटील, किरण नगराळे, गोपाल अन्सारी, संदीप पाटील आदी उपस्थित हाेते. आमदार कुणाल पाटील यांच्यासह मान्यवरांनी मंत्री राऊत यांचा सत्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.