आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:संविधान प्रचार माेहीम यात्रेचे आज आगमन

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यव्यापी संविधान प्रचार माेहीम यात्रेचे उद्या गुरुवारी (दि.३) शहरात आगमन हाेणार आहे. संविधान बांधिलकी महाेत्सव समितीतर्फे यात्रेचे स्वागत करण्यात येईल, अशी माहिती अंनिसचे अविनाश पाटील यांनी दिली. यात्रेचा संविधान दिनी २६ नाेव्हेंबरला नागपूरच्या दीक्षाभूमी येथे समाराेप हाेणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवानिमित्त ही यात्रा निघाली आहे. यात्रेचे नाशिकचे संविधान अभ्यासक अनंत भवरे यांनी समन्वयन केले आहे. यात्रेत जितेंद्र भावरे, सदाशिव मानकरी, याेगेश साळवे, आसाराम गायकवाड, दादासाहेब कांबळे आदी सहभागी झाले आहे. शहरात उद्या गुरुवारी दुपारी १२ वाजता भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेचे स्वागत केले जाईल. दुपारी २ वाजता काकासाहेब बर्वे छात्रालयात संवाद बैठक हाेईल.

बातम्या आणखी आहेत...