आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव‎:किल्ले निर्मिती, रांगोळी स्पर्धा विजेत्यांचा गौरव‎

नंदुरबार‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ जयंतीनिमित्त डॉ. विक्रांत मोरे मित्र मंडळ‎ आणि शिरीष चौधरी मित्र मंडळाच्या वतीने‎ आयोजित स्पर्धेत ऐतिहासिक किल्ले‎ निर्मिती स्पर्धेत प्रथम पारितोषिक पवन भरत‎ गवळी यांच्या संघाने पटकावले तर रांगोळी‎ स्पर्धेत प्रथम पारितोषिक राहुल नामदेव‎ भामरे यांच्या संघाने पटकावले.‎ बक्षीस वितरण तैलिक मंगल कार्यालय‎ येथे आदिवासी विकास मंत्री डॉ.‎ विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाले. या‎ वेळी शिरीष चौधरी, डॉ. विक्रांत मोरे,‎ जिजामाता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य‎ डॉ. सतीश देवरे, माजी नगरसेवक चारुदत्त‎ कळवणकर, गौरव चौधरी, प्रशांत चौधरी,‎ संतोष वसईकर, आनंद माळी, दीपक‎ पाटील उपस्थित होते. ऐतिहासिक किल्ले‎ निर्मितीत ६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता.‎

तर रांगोळी स्पर्धेत ३२५ स्पर्धकांनी सहभाग‎ नोंदवला होता. ऐतिहासिक किल्ले निर्मिती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्पर्धेत प्रथम पारितोषिक पवन भरत गवळी‎ यांच्या संघाने पटकावले. द्वितीय श्रुती राम‎ सूर्यवंशी हिच्या संघाने, तर तृतीय क्रमांक‎ शांतिलाल मोतीलाल पाडवी यांनी‎ पटकावले. रांगोळी स्पर्धेत प्रथम‎ पारितोषिक राहुल नामदेव भामरे यांच्या‎ संघाने पटकवले.

द्वितीय मयूरी सतीश‎ गायकवाड, तृतीय गौरव शांताराम माळी‎ तसेच उत्तेजनार्थ, प्रोत्साहनपर पारितोषिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देण्यात आले. या वेळी शिरीष दादा मित्र‎ मंडळाच्या वतीने संत सावता शिवजयंती‎ मंडळास (२१ हजार ) उत्कृष्ट शोभायात्रा‎ पारितोषिक तर द्वितीय रोकडेश्वर हनुमान‎ व्यायाम शाळा मंडळास रोख अकरा हजार‎ रुपये, सन्मानचिन्ह देण्यात आले.‎ प्रास्ताविक डॉ. अनंत देशमुख यांनी केले.‎ सूत्रसंचालन प्रा. विजय खंडारे यांनी केले.‎ आभार सुनील सूर्यवंशी यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...