आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:शंभर फुटी रस्त्यासह पांझरा नदी किनारी सायकल ट्रॅकची निर्मिती, आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अनेक जण रोज सायकलिंग करतात

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ध्वनी व वायुप्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस सायकल चालवावी यासाठी महापालिका वारंवार आवाहन करते. दुसरीकडे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी अनेक जण रोज सायकलिंग करतात. हे प्रमाण वाढावे यासाठी महापालिकेने शहरातील शंभर फुटी रस्ता व पांझरा नदी किनारी असलेल्या रस्त्याच्या शेजारी स्वतंत्र सायकलिंग ट्रॅक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न होत आहे. शासनाच्या आदेशानुसार माझी वसुंधरा अभियान राबवले जाते आहे. पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जागृती केली जाते आहे. वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी व्हावे यासाठी नागरिकांनी शक्य तेथे सायकलचा उपयोग करावा यावर जनजागृती होते. दुसरीकडे आरोग्य चांगले राहावे यासाठी अनेक जण आता रोज सायकलिंग करण्यास प्राधान्य देत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पांझरा किनारी असलेला रस्ता व शंभर फुटी रस्त्यावर स्वतंत्र सायकल ट्रॅक तयार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सायकलस्वारांची सोय होईल. शहरात स्वतंत्र सायकल ट्रॅक करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून सायकलस्वारातर्फे केली जात होती. त्यानुसार हे काम केले जाते आहे.

प्रत्येक मंगळवारी महापालिकेचा सायकल डे
महापालिकेतर्फे दर मंगळवारी सायकल डे पाळण्यात येतो. त्यानुसार या दिवशी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी सायकलीने कार्यालयात येतात. या उपक्रमामुळे इंधन बचत तरच होते शिवाय शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या रस्त्यावर ५.५ किलोमीटरचा तर शंभर फुटी रस्त्यावर कोरके नगरपासून ते थेट महामार्गापर्यत १.५ किमी सायकल ट्रॅक असेल.

दोन्ही रस्त्याच्या शेजारी सायकल चालवणाऱ्यांसाठी काही फूट जागा राखीव असेल. त्यासाठी रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यात येतील. तसेच दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल.

ट्रॅकच्या कामासाठी निविदा प्रक्रिया झाल्यावर काम सुरू होणार आहे. नियोजित रस्त्यावर दीड मीटर रस्ता सायकल ट्रॅकसाठी राखीव असेल.

सायकलिंगला चालना
दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रहदारीचे प्रमाण जास्त असल्याने सायकलिंग करणे सायकलपटू टाळतात. सायकल ट्रॅक झाल्यावर बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. सायकल ट्रॅक होणे ही आनंदाची बाब आहे. पराग पाटील, सायकलपटू

सायकलिंग करणे चांगला व्यायाम
नियमित सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले असते. सायकल कुणीही चालवू शकतो. शहरात आता सायकल चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीला बळ मिळेल. डॉ. सुनील नाईक, स्त्रीरोगतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...