आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास कामांना प्रारंभ:मुकटीत काँक्रिटीकरणासह भिंत बांधण्याचे काम सुरू

धुळे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील मुकटी येथे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांना प्रारंभ झाला. त्यात रस्ता काँक्रिटीकरण, संरक्षण भिंतीचे काम आदी कामांचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार कुणाल पाटील यांचा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. जिल्हा वार्षिक नियोजन, जनसुविधा, दलित वस्ती योजना आदी विविध योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या मीनल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल सैंदाणे, सरपंच गुलाबराव पाटील उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...