आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक‎:ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे‎ जनजागृतीसाठी शहरातून निघाली मिरवणूक‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे जनजागृती‎ अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली.ग्राहक तक्रार‎ निवारण आयोगाचे अध्यक्ष एस. पी. बोरवाल अध्यक्षस्थानी‎ होते. या वेळी ग्राहक संरक्षण कायदे, ग्राहकांचे हक्क व‎ अधिकार याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच‎ माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर चित्ररथ‎ रॅली काढण्यात आली.

या वेळी आयोगाचे सदस्य संजय‎ जोशी, प्रतिभा पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.‎ आर. डी. जोशी, वकील संघाचे सदस्य ॲड. जितेंद्र निळे,‎ ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष व आयोगाचे माजी सदस्य‎ ॲड. चंद्रकांत येशीराव, ग्राहक फाउंडेशनचे अध्यक्ष ईश्वर‎ बारी, प्रबंधक कैलास बैरागी, सहायक अधीक्षक एस. टी.‎ देशमुख, सहायक लेखाधिकारी भगवंत कपाळे आदी‎ उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहक‎ कायद्याविषयी जनजागृ़ती करण्यात आली. फसवणूक‎ झाल्यावर नागरिकांनी दाद मागावी, असे आवाहन झाले.‎

बातम्या आणखी आहेत...