आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्राहकांच्या हितांसाठी जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक परिषदेवर सव्वा वर्षापूर्वी सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र निवडीनंतर पंधरा महिने उलटूनही अद्यापपर्यंत परिषदेची एकही बैठक झालेली नाही. ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदनही उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना देण्यात आले आहे.
ग्राहक संरक्षण परिषदेवर सदस्यांची निवड जवळपास पंधरा महिने होऊनही एकही बैठक झाली नाही. तरी ही बैठक घ्यावी, या मागणीचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र धुळे जिल्ह्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांना देण्यात आले. ग्राहकांचे प्रश्न तातडीने सुटले पाहिजे, त्यांच्या अधिकाराचे संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६च्या कलम ७ व ८नुसार ग्राहक संरक्षण परिषद गठीत करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १२ शासकीय व २४ अशासकीय सदस्यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड करण्यात आली आहे. ही निवड होऊन जवळपास पंधरा महिने झाले, तरी अद्याप एकही बैठक झालेली नाही. मध्यंतरी कोरोना महामारीचा काळ होता. या काळात सर्वत्र ऑनलाइन बैठका होत होत्या. आता कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहे. तरी फिजिकल बैठक घेण्यात यावी. निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र धुळे जिल्हाध्यक्ष अॅड. जे.टी. देसले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. एन. के. वाणी, जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा, जिल्हा सहसंघटक पी. झेड. कुंवर, जयश्री शाह, जिल्हा सचिव एस एम.पाटील, सहसचिव एम. टी. गुजर, राकेश मोरे,राजेंद्र भंडारी, बी. एम. भामरे यांचे हस्ताक्षर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.