आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोल:वेतनासाठी ठेकेदारास मिळतात 13 हजार,‎ कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये देतो फक्त 5 हजार‎; ओळख परेडला 263 पैकी 104 कर्मचारी

धुळे‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचारी व‎ जलकुंभावर सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ठेका‎ आस्था स्वयंराेजगार संस्थेला मनपाने‎ दिला आहे. या संस्थेविषयी अनेक तक्रारी‎ होत्या. त्यामुळे महापौर प्रतिभा चौधरी‎ यांनी गुरुवारी कर्मचाऱ्यांची ओळखपरेड‎ घेतली. या वेळी २६३ पैकी केवळ १०४‎ कर्मचारी हजर होते.

या विषयी अतिरिक्त ‎ ‎ आयुक्त नितीन कापडणीस यांना महापौर ‎ ‎ चौधरी यांनी विचारणा केली पण त्यांना ‎ ‎ समाधानकारक उत्तर देता आले नाही. ‎ ‎ दुसरीकडे महापालिका ठेकेदाराला प्रती ‎ ‎ कर्मचारी १३ हजार रुपये वेतनासाठी देते.‎ ठेकेदार प्रत्यक्षात ५ हजार रुपयेच देतो‎ असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.‎

एकवीरा देवी मंदिराजवळील उद्यानात‎ ओेळख परेड झाली. आस्था संस्थेने २२३ ‎ ‎ कर्मचारी आरोग्य विभागाला व ४०‎ कर्मचारी पाणीपुरवठा विभागाला पुरवले‎ आहे. ओळख परेडला प्रत्यक्षात १०४‎ कर्मचारी हजर तर १५९ कर्मचारी गैरहजर‎ होते. या वेळी अनेक कर्मचाऱ्यांकडे‎ गणवेश, ओळखपत्र, सुरक्षा साहित्य‎ आढळले नाही. तसेच काही कर्मचारी‎ बनावट असल्याचे दिसून आले.

आस्था ‎ ‎ संस्थेला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ‎ ‎ महापालिकेतर्फे प्रति कर्मचारी प्रति दिन‎ ५०७ रुपये ६३ पैसे प्रमाणे २६ दिवसांचे १३‎ हजार रुपये दिले जातात. दुसरीकडे‎ ठेकेदार कर्मचाऱ्यांना दरमहा २६ दिवसांचे‎ ५ हजार रुपये वेतन देतो असा आरोप‎ करण्यात आला.‎

पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी‎

कंत्राटदाराला मनपातर्फे बिल देताना कोणती‎ यादी ग्राह्य धारली जाते व कोणता निकष‎ लावला जातो याबाबतची विचारणा महापौर‎ प्रतिभा चौधरी यांनीअतिरिक्त आयुक्त नितीन‎ कापडणीस यांना केली. त्या वर नितीन‎ कापडणीस यांना समाधानकारक उत्तर देता‎ आले नाही. कंत्राटदाराला पाठीशी घालणारे व‎ स्वत:चा आर्थिक लाभ करून घेणारे अधिकारी‎ व आरोग्य विभागातील कार्यालय प्रमुख,‎ स्वच्छता निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई करून‎ त्यांच्या सेवापुस्तकात नोंद करावी असे आदेश‎ महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिले.‎

याद्या अद्ययावत नसल्याचे केले मान्य‎

महापालिकेत जमा होणाऱ्या करातून आस्था संस्थेला बिल‎ दिले जाते. संस्थेला बोगस, अवाजवी बिल दिल्याने‎ महापालिकेचे आर्थिक नुकसान व फसवणूक होते आहे.‎ त्यामुळे कागदोपत्री दाखवलेले पण प्रत्यक्षात उपस्थित‎ नसलेल्या कर्मचा ऱ्यांची देयके प्रशासनामार्फत ठेकेदाराला‎ का दिली जातात असा प्रश्न या वेळी महापौर प्रतिभा‎ चौधरी यांनी उपस्थित केला. तसेच आरोग्य विभागातर्फे‎ महापौरांना देण्यात आलेली कर्मचाऱ्यांची यादी व प्रत्यक्षात‎ कंत्राटदाराने सोबत आणलेली यादीत तफावत आढळून‎ आली. आरोग्य विभागात नेमलेल्या कर्मचाऱ्यांची यादी‎ अद्ययावत नसल्याचे आरोग्य विभागाचे कार्यालयप्रमुख व‎ स्वच्छता निरीक्षकांनी मान्य केले.‎

अनुपस्थित‎ कर्मचाऱ्यांची‎ तपासणी करणार‎

ओळख परेडला काही कर्मचारी अनुपस्थित होते. अनुपस्थित कर्मचाऱ्यांची पुन्हा ओळख परेड घेण्यात येणार‎ आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची कामगार आयुक्त, ईएसआयसीकडून तपासणी होईल.‎ कर्मचाऱ्यांची यादी व बँकेत असलेल्या वेतनाच्या नोंदी तपासल्या जातील. संबधित संस्था कर्मचाऱ्यांना दोन ते‎ अडीच हजार रुपये कमी देत असल्याचे आढळले. कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना काही रक्कम आगाऊ दिल्याने‎ वेतन रक्कम कमी केल्याचे सांगितले आहे.

-नितीन कापडणीस, अतिरिक्त आयुक्त, मनपा‎

कामाचे ठिकाणही सांगता येत नाही

या वेळी महापौर प्रतिभा चौधरी‎ यांनी काही कर्मचाऱ्यांना ते कोणत्या भागात व प्रभागात काम करतात अशी‎ विचारणा केली. या वेळी कर्मचाऱ्यांना ते कोणत्या भागात काम करतात याची‎ माहिती देता आली नाही. त्यामुळे आस्था संस्थेच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह आहे.‎ महापालिकेला कर्मचारी पुरवणाऱ्या आस्था‎ संस्थेविषयी यापूर्वीही तक्रारी करण्यात‎ आल्या आहे. त्यानुसार माजी स्थायी समिती‎ सभापती संजय जाधव यांनी या मुद्दा मांडला‎ होता. तसेच पीएफ विभागात कंत्राटी‎ कर्मचाऱ्यांचा पीएफ भरला जातो का याची‎ चौकशी करावी, अशी मागणी केली होती.‎ तसेच नगररचना विभागाकडेही तक्रार‎ करण्यात आली होती. त्यानंतर माजी स्थायी‎ समिती सभापती शीतल नवले यांनीही स्थायी‎ समितीच्या सभेत याविषयी तक्रार केली‎ होती. तसेच महासभेतही तक्रार होती.‎

बायोमेट्रिक हजेरी सुरू करा‎

आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची‎ बायोमेट्रिक हजेरी सुरू करावी, आरोग्य‎ विभागाच्या कामकाजात पारदर्शकता‎ आणावी असे आदेश महापौर प्रतिभा‎ चौधरी यांनी दिले. या वेळी आरोग्य‎ विभागाचे प्रमुख राजेंद्र माईनकर,‎ स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे, साईनाथ‎ वाघ, गजानन चौधरी, शुभम केदार,‎ गौरव माळी, मुकादम राजेंद्र पाटील, रवींद्र‎ माळी, महेश सोनवणे, कंत्राटदार जाकीर‎ शेख आदी उपस्थित होते. याविषयी‎ चौकशीची गरज आहे.‎