आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सिंधूरत्नज एस.व्ही.सी इंग्लिस स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतुहुल निर्माण करण्यासाठी व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकाेन वाढीस लावा म्हणून पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवले. त्याचे उद्घाटन प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सिंधूरत्नज सेवा संस्थेचे अध्यक्ष तनुकुमार दुसेजा, शाळेचे चेअरमन सुरेश कुंदनानी, जेठानंद हासवानी, मुख्याध्यापक खान, उपमुख्याध्यापिका शालिनी मंदान उपस्थित हाेते. विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक वैज्ञानिक रांगाेळीने पाहुण्याचे लक्ष वेधले. या प्रदर्शनात ६० ते ९० उपकरणे मांडण्यात आली हाेती. त्यात मानवी शरीररचना, समुद्रातील जीवसृष्टी, अणुसंरचना, विद्युत, रेल्वे, डीएनए प्रक्रिया, लसीकरण, पचनसंस्थेचे कार्य, श्वसननलिका, कार्यप्रणाली, वाफेचे इंजिन, विविध प्राण्याच्या जीवनचक्राची माहिती सादर केली. त्यासाठी विज्ञान शिक्षक देवरे, कविता गंगावणे, वंदना माळी, कीर्ती पाठक, पूजा पाटील, भाविका पंजाबी, काजल लखवाणी, प्रियंका गुरूदासानी, दीपा बजाज आदींचे मार्गदर्शन लाभले. या शिक्षकांधिकाऱ्यांनी बालवैज्ञानिकांचे काैतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.