आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाब्दिक वाद:उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतानाच वाद; एमआयएमचे 10 कार्यकर्त्यांना दिली समज

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध मागण्यांचे निवेदत देताना एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचा निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याशी शाब्दिक वाद झाला. त्यामुळे पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले. समज देत काही वेळाने त्यांना सोडले.निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड त्यांच्या दालनात एमआयएमचे पदाधिकारी नासीर पठाण व इतर कार्यकर्ते आले.

दालनात पाचपेक्षा अधिक नागरिकांना येण्याची परवानगी नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले. त्यानंतर एमआयएम कार्यकर्त्यांनी शाब्दिक वाद घातला. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड मागे सरकले. या वेळी कार्यकर्त्यांनी निवेदनाची प्रत थेट त्यांच्या खुर्चीला चिकटवली. शहर पोलिसांनी सुमारे १० जणांना ताब्यात घेतले. सर्वांना शहर पोलिस ठाण्यात नेल्यावर सोडले.

बातम्या आणखी आहेत...