आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:दुपारी पावणेबारा, साडेतीनला मेमूची फेरी सुरू झाल्याने सोय; प्रवाशांना मिळणार दिलासा

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे ते चाळीसगाव मेमूच्या दोन वाढीव फेऱ्यांना सोमवारपासून प्रारंभ झाला. त्यानुसार आता दिवसातून मेमूच्या चार फेऱ्या होतील. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे धुळे ते चाळीसगाव पॅसेंजरसह रात्री या पॅसेंजरला मुंबईला जाण्यासाठी जोडली जाणारी बोगी बंद झाली होती. कोरोनाचा फैलाव कमी झाल्यावर धुळे ते चाळीसगाव दरम्यान मेमू सुरू झाली. सुरुवातीला सकाळी व सायंकाळी दोनच फेऱ्या होत होत्या. पण प्रवाशांची मागणी व गरज लक्षात घेऊन सोमवारपासून मेमूच्या दोन फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यातून प्रवाशांची सोय झाली.

या वेळेत होतील चार फेऱ्या
धुळे रेल्वे स्टेशनमधून सकाळी ७ वाजून ५० मिनिटे, दुपारी ११ वाजून ४० मिनिटे, ३ वाजून ३० मिनिटे व सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी मेमू सुटेल.

प्रवास भाडे असेल ३५ रुपये
धुळे-चाळीसगाव स्पेशल ट्रेन असल्याने चाळीसगावसाठी ३५ रुपये लागतील. चाळीसगावपूर्वी येणाऱ्या स्थानकावर उतरण्यासाठी ३० रुपये तिकीट लागेल.