आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सकस आहाराचे पटवून दिले महत्त्व; साक्री तालुक्यातील मचमाळ येथे झाली कार्यशाळा

पिंपळनेर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे येथील लुपीन फाउंडेशन व दहिवेल येथील बालविकास प्रकल्पातर्फे साक्री तालुक्यातील मचमाळ येथे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी सकस पोषण आहारावर मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडीतील पाल्य, त्यांचे पालक, गरोदर व स्तनदा मातांसाठी ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेत गरोदर, स्तनदा माता व शून्य ते सहा वर्ष वय असलेल्या बालकांची काळजी कशी घ्यावी आदी विषयावर रोहोड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. रूपाली बागुल यांनी मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सरपंच रेखा गांगुर्डे, दहिवेलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कविता पाटील, उपसरपंच येशूबाई जाधव, पंचायत समितीचे सदस्य मनोज जगताप, लुपीन फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक नीलेश पवार, तालुका समन्वयक उमाकांत पाटील, विभाग समन्वयक उमाकांत साळुंके उपस्थित होते. दहिवेलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कविता पाटील यांनी राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थित बालकांना खाऊ म्हणून प्रत्येकी १ किलो खजूर वितरित करण्यात आले. लुपीन फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक नीलेश पवार यांनी प्रास्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...