आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षांत सोहळा:पोलिस प्रशिक्षण केंद्रात 587 कर्मचाऱ्यांचा दीक्षांत

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सोमवारी ५८७ पोलिसांचा दीक्षांत सोहळा झाला. कार्यक्रमाला कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षण व खास पथकाचे पोलिस महासंचालक संजयकुमार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहंमद, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक सदाशिव पाटील, उप वनसंरक्षक नितीनकुमार सिंग, सहाय्यक उपवनसंरक्षक अमित जाधव, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहायक पोलिस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्ड, पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य किशोर काळे आदी उपस्थित होते.

२ हजार ४०० प्रशिक्षीत : केंद्रात प्रशिक्षण घेणारी ही नववी तुकडी होती. केंद्रातून २ हजार ४८७ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळाले. दीक्षांत समारंभ सहभागी झालेले कर्मचारी ७ फेबुवारीपासून प्रशिक्षण घेत होते. त्यात विविध जिल्ह्यातील ५८७ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...