आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:मनपा हद्दवाढ क्षेत्रातील जागांचे उतारे मागवले

धुळे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या दहा गावातील शासकीय जमिनींची परस्पर विक्री केल्याची तक्रार झाल्यावर चौकशी सुरू झाली आहे. आता महापालिका प्रशासनाने तहसीलदारांना पत्र देत मनपा हद्दवाढीच्या भागातील शासकीय जमिनीची माहिती व सातबारा उतारे मागवले आहे.

महापालिकेच्या हद्दीत आलेल्या दहा गावांच्या ग्रामपंचायतींची सर्व मालमत्ता व दप्तर मनपाने ताब्यात घेतले आहे. पण या गावातील अनेक शासकीय जमिनींची परस्पर विक्री करण्यात आली आहे. तसेच जागेची नोंद असलेल्या रजिस्टरमध्येही खाडाखोड करण्यात आली आहे. त्यानंतर तत्कालीन उपायुक्त शिल्पा नाईक यांची भूखंड तपासणीसाठी नियुक्त झाली. त्यांच्या बदलीनंतर उपायुक्त विजय सनेर आले. त्यांनी आता सर्व भूखंड, सातबारा उताऱ्यांची माहिती तहसील कार्यालयातून मागवली आहे.

बातम्या आणखी आहेत...