आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपूर्वी भाज्यांचे दर वाढले होते. त्यामुळे राेजच्या जेवणातून भाज्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांपासून भाज्यांची आवक वाढल्याने दर घसरले आहे. बाजारात मेथी, पालक, मुळा, कोथिंबीरची जुडी दहा रुपयांना एक याप्रमाणे विक्री होते आहे. तसेच फळभाज्याही चाळीस ते साठ रुपये प्रति किलाेने विक्री हाेत आहे. दुसरीकडे अद्याप वाटाणेची आवक वाढली नसल्याने दर तेजीत आहे. मटारची ६० ते ८० रुपये किलोने विक्री हाेते.
यंदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले. परिणामी बाजारपेठेत भाज्याची आवक कमी झाली हाेती. दुसरीकडे मागणी जास्त होती. त्यामुळे भाज्यांच्या दरात काही प्रमाणावर वाढ झाली हाेती. एक महिन्यापूर्वी मेथी, मुळा, शेपू-पालक, कांद्याची पात २० रुपये जुडी प्रमाणे विक्री होत हाेती. मेथीची एक जुडी ३० रुपयांवर गेली हाेती.
फ्लॉवर १०० ते १२० रुपये किलाे, कारले, दाेडके, गिलके ६० ते ८० रुपये किलो होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून भाजी गायब झाली हाेती. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बाजारात भाज्यांचे दर कमी झाले आहे. मेथी, मुळा, शेपू-पालकाची जुडी दहा रुपयांना विक्री होते. फळभाज्यांचे दरही कमी झाले आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
गाजर, टाेमॅटाेचे दर घसरले
बाजारात गाजर, टाेमॅटाेची आवक वाढली आहे. सद्य:स्थितीत टाेमॅटाे दहा ते वीस रुपये किलाेप्रमाणे विक्री होत आहे. तसेच गाजराची आवक वाढल्याने त्यांची २५ ते ३० रुपये किलोने विक्री होते आहे. काही दिवस भाज्यांचे दर कमी राहतील, अशी माहिती शहरातील भाजी विक्रेत्यांकडून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.