आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधक लस:सीईओंच्या समुपदेशनानंतर आदिवासी महिलेला कोरोना प्रतिबंधक लस ; नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

साक्री24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील खैरखुंटा येथे भेट दिली. त्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर आदिवासी महिलेने कोरोना प्रतिबंधक लस घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर खैरखुंटा (ग्रा.पं. उमरपाटा) येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी गावातील एका महिलेची मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी भेट घेतली. या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नव्हता. लसीकरण करून घेण्यास ही महिला नकार देत होती. त्यामुळे बुवनेश्वरी एस यांनी या महिलेचे समुपदेशन केले. लस घेतल्याने काय फायदे आहेत याची माहिती दिली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे महिलेच्या निर्णयात बदल झाला. त्यानंतर या महिलेला स्वतः सीईओ बुवनेश्वरी एस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन आल्या. तसेच या महिलेला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला. या वेळी गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य छगन राऊत, पंचायत समिती सदस्या रुथा बिलकुले आदी उपस्थित होते. त्यांना विविध सूचना करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...