आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:कोरोना लसीकरणाला आजपासून पुन्हा गती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर मंदावलेले लसीकरण पुन्हा वेगात सुरू करण्यासह चाचण्या वाढवण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी झाले आहे. चार महिन्यांपासून जिल्ह्याला कोविशील्ड लस मिळालेली नाही. तसेच कॉर्बाेव्हॅक्स लसीचा पुरवठाही बंद झाला होता.

आता चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्याने आरोग्य विभागासह नागरिकही सतर्क झाले आहे. त्यामुळे बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात बूस्टर डोसच्या चौकशीसाठी काही जण आले होते. दुसरीकडे बुधवारी आरोग्य विभागाची ऑनलाइन बैठक झाली. या वेळी आरोग्य मंत्र्यांनी कोरोना तपासण्या व लसीकरण वाढवण्याचे आदेश दिले. त्यामुळे गुरुवारपासून पुन्हा गावागावात लसीकरण सुरू केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आराेग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

बूस्टर घेणारे ५ टक्के
जिल्ह्यात १५ लाख १ हजार ३०५ नागरिकांनी म्हणजेच ७९.११ टक्के नागरिकांनी पहिला तर १२ लाख ४१ हजार २६४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत ६५.४१ टक्के लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात ९ लाख ४४ हजार ८१० पैकी १ लाख ५८ हजार ८८ म्हणजे ५ टक्के नागरिकांनी बूस्टर घेतला.

बातम्या आणखी आहेत...