आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिग:कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यास म्यूकरमायकोसिसचा धोका शून्य; 300 रुग्णांच्या तपासणीतून धुळ्याच्या रुग्णालयाचा निष्कर्ष

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विश्लेषणातून ही माहिती संकलित केली आहे. - डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, हिरे रुग्णालय, धुळे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना म्यूकरमायकोसिसचा धोका शून्यापर्यंत कमी होऊ शकतो, असा निष्कर्ष हिरे रुग्णालयाने ३०० रुग्णांच्या तपासणीतून काढला आहे. या माहितीचे विश्लेषण व निष्कर्षाला आधार ठरणाऱ्या बाबी रुग्णालय प्रशासनानने मुंबईतील वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंडळाला पाठवल्या आहेत. यातून कोरोनाच्या लसची गुणवत्तादेखील लक्षात येते.

हिरे रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत ३०० रुग्णांची बाह्यरुग्ण कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी झाली. यापैकी कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेला एकही म्यूकरबाधित रुग्ण आढळला नाही. या सर्व ३०० रुग्णांची उपचार-केस स्टडीसाठी इत्थंभूत माहिती घेण्यात आली. कोरोना झाला होता का, कुठे व कसे उपचार केले यापासून लस घेतली का आदी माहिती संकलित केली. या डाटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून दोन्ही डोस घेणाऱ्यांना म्यूकरचा धोका शून्यवत होतो हा निष्कर्ष समोर आला आहे.

या निष्कर्षाला बळकटी देणारे पुरावे-बाबी व संपूर्ण विश्लेषणात्मक माहिती मुंबईला वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे. हे विश्लेषण देशपातळीवरही महत्त्वपूर्ण ठरू शकते असा विश्वास हिरे रुग्णालयाच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. आतापर्यंत ७० म्यूकरचे रुग्ण आढळून आले. यापैकी सुमारे १७ रुग्णांवर गरजेनुसार लहान-मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. इतरांना हिरे रुग्णालयाच्या स्टाफने औषधोपचाराने ठणठणीत केले.

विश्लेषणातून माहिती...
कोरोनासोबत म्यूकरमायकोसिसच्या बाधितांवरही उपचार केले आहेत. सुमारे ३०० रुग्णांची हिरे रुग्णालयात तपासणी झाली. केस स्टडीसाठी या रुग्णांची माहिती घेतल्यावर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाला म्यूकरमायकोसिस झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्लेषणातून ही माहिती संकलित केली आहे. - डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, हिरे रुग्णालय, धुळे.

बातम्या आणखी आहेत...