आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कोरोनाने एकल महिलांना रोजगाराची माहिती‎, मिशन वात्सल्य’ अंतर्गत मिळणार लाभ

सोनगीर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे‎ निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या‎ महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी‎ योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन‎ वात्सल्य’समितीतर्फे कोरोना एकल महिला‎ मेळावा तथा रोजगार विषयक मार्गदर्शन‎ शिबिर बस स्थानक जवळील सिंधू त्र्यंबक‎ हॉल मध्ये सोमवारी घेण्यात आले. सोनगीर‎ व परिसरातील शेकडो महिलांनी विविध‎ योजनांची माहिती जाणून घेतली.‎ मेळावा प्रसंगी मान्यवरांनी विविध‎ योजनांची माहिती दिली. बस स्थानक‎ जवळील सिंधू त्र्यंबक हॉलमध्ये मेळाव्याचे‎ आयोजन करण्यात आले होते. या वेळी‎ शेकडो महिलांनी विविध योजनांची माहिती‎ जाणून घेतली. कार्यक्रमाच्या अध्य‌क्षस्थानी‎ महिला बाल कल्याण समितीच्या सभापती‎ धरती देवरे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून‎ तहसीलदार गायत्री सैंदाणे होत्या.यावेळी‎ बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा मिशन‎ वात्सल्य समितीचे सचिव दीपाली देसले,‎ सप्तशृंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा‎ मीनाताई भोसले,बाल विकास प्रकल्प‎ अधिकारी आर.व्ही. बिरारी, श्रीमती‎ एस.बी. पाटील, तृप्ती पालवे,जिल्हा परिषद‎ सदस्या वैशाली चौधरी, सरपंच रुख्माबाई‎ ठाकरे, सदस्य ईश्वर पाटील,मंडळाधिकारी‎ राजपूत, तलाठी जितेंद्र चव्हाण,‎ ग्रामपंचायत सदस्य आरिफ खॉ पठाण,‎ पर्यवेक्षिका बेबी चौधरी,ज्योत्स्ना पाटील,‎ आदींनी योजनांची माहिती दिली.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली निकम‎ यांनी तर उपस्थितांचे आभार सुजाता बोरसे‎ यांनी मानले.‎

महिलांना या योजनांचा मिळवून देणार लाभ‎ ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या योजना कुटुंब निवृत्तिवेतन योजना,‎ एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ‎ योजना, श्रावणबाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय‎ वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आदी योजना तसेच‎ स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनांसाठी संबंधित‎ महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरून घेऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार‎.

बातम्या आणखी आहेत...