आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पाण्यासाठी नगरसेविका थेट जलकुंभावर ; आंदोलन : प्रभाग तीनमध्ये आठ दिवसांनी पाणी, सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी आंदोलन झाले. देवपूरातील प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका नाजिया पठाण या परिसरातील महिलांसह देवपूरातील नवरंग जलकुंभाजवळील नवीन जलकुंभावर चढल्या. आंदोलकांनी मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा नगरसेविका नाजिया पठाण यांनी दिला आहे.

शहरात एप्रिल महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होते आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यापूर्वी देवपूर परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढला. मौलंवी गंज भागातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. सलग तीन ते चार दिवसापासून पाणीप्रश्नी आंदोलन सुरू आहे. त्यानंतर शुक्रवारी देवपूरातील विटाभट्टी परिसरातील नगरसेविका नाजिया पठाण यांनी प्रभागातील काही महिलांसह सकाळी देवपूरातील नवीन नवरंग जलकुंभावर चढून आंदोलन केले. या वेळी प्रशासन व सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी झाली. दहा ते पंधरा मिनिट घाेषणाबाजी केल्यानंतर आंदोलनकर्त्या महिला स्वत: जलकुंभावरून खाली उतरल्या.

बातम्या आणखी आहेत...