आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहीहंडी उत्सव:दोंडाईचातील रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केल्या वेशभूषा

दोंडाईचा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव झाला. विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा केली होती. शाळेतील मधुलिका गिरासे, मृणाली पाटील, समीक्षा गिरासे, लावण्या गिरासे, किरण धनगर यांनी कृष्ण जन्मला गं बाई हे गीत व यज्ञ गिरासे, दर्शन पाटील, अदित राजपूत, वेदांत बागल, ओम गिरासे यांनी अच्युतम् केशवम् कृष्ण दामोदरम् हे भजन सादर केले.

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. वेदांत भावसार याने दहीहंडीचे महत्त्व सांगितले. प्राचार्य एम. पी. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष हिमांशू शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. आशा टोणगावकर, डॉ. राजेश टोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डी. एम. पाटील, राहुल भावसार, गोपाल ढोले, संदीप सोनवणे, हर्षल गुप्ता, कीर्ती शाह, प्रियंका थोरात, हर्षा राजपूत आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...