आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड:तऱ्हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडे, लोढरे परिसरात कापूस लागवडीला सुरुवात

तऱ्हाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तऱ्हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडे, लोढरे तऱ्हाड कसबे, भामपूर, विखरण परिसरात शेतकऱ्यांची खरीप पुर्व हंगामाच्या कापूस पीक लागवडीसाठी तयारी सुरू आहे.

पारा ४० अंश सेल्सिअस असतानाही शेतकरी कुटुंबासह व मजुरसह कापूस लागवडीसाठी ठिबकच्या नळ्या अंथरण्यासाठी दिवसभर शेतात दिसून येत आहे. बाजारात बिटी कपाशी बियाणे दाखल होऊन प्रत्येक कृषी सेवा केद्रावर बियाणेही उपलब्ध झाली आहेत. सध्याच्या परिस्थितीत तऱ्हाडी परीसरात कुपनलिकाची पाण्याची पातळी खोलवर गेल्याणे शेतात पाणी टचाईची समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पिकांना चारीद्धारे पाणी न देता कमी पाणी असल्याने ठिबक सिंचन करण्यास यदा शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. दरम्यान, तऱ्हाडी गावात चार कृषी सेवा केद्र आहेत. या दुकानांवर शेतकऱ्यांनी १जूनपर्यत बीटी कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी चौकशी केली असता १ जून पूर्वी बियाणे विकत मिळाले नाही व १ जूनपासून बिटी कापसाचे वाण प्रत्येक शेतकऱ्यांला मुबलक उपलब्ध होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...