आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त; ५ जण अटकेत

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचवार गावाच्या शिवारात धुळे एलसीबी पथकाने छापा टाकून बनावट मद्याचा साठा जप्त करून कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणी ५ जणांना सोनगीर पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला. किरण सुधाकर देशमुखने बनावट मद्याचा कारखाना सुरू केल्याचे समोर आहे. या वेळी किरण देशमुख (४५), रामसिंग बन्सीलाल ठाकरे (२५, रा. दोंडाईचा), हरीष अरुण पटेल (२६), शेतमालक रफीक मेहमूद पटेल (३०) हे बनावट मद्य तयार करताना मिळून आले. या कारवाईत २ लाखांचे वाहन (एमएच १९, एएक्स ०६२०) तसेच बनावट मद्यसह इतर ४ लाख ६३ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...