आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:18 टेबलांवर मतमाेजणी; 11 वाजता पहिला निकाल

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १२८ पैकी ११८ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. त्यात धुळे तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींचा समावेश हाेता. धुळे तालुक्यात ७६.८७ टक्के मतदान झाले होते. मतमाेजणी उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून जेलराेडवरील तांत्रिक विद्यालयात होईल. मतमाेजणीच्या सात फेऱ्या होतील. तसेच १८ टेबलवर मतमोजणी होईल. पहिला निकाल अकरा वाजेपर्यंत नंदाळे किंवा हाेरपाडा ग्रामपंचायतीचा लागेल.

धुळे तालुक्यातील ३३ पैकी बेहेड, मेहेरगाव व नावरा या तीन ग्रामपंचायती बिनविराेध झाल्या आहे. आता सदस्यांच्या ३०४ जागांसाठी पाचशेपेक्षा जास्त उमेदवार रिंगणा+त आहे. मतमाेजणीसाठी प्रत्येक टेबलावर तीन कर्मचारी व एक शिपाई असेल.

एकूण ७२ कर्मचारी मतमाेजणी करतील. कर्मचाऱ्यांचे सोमवारी प्रशिक्षण झाले. उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार संजय पवार यांनी मतमोजणीचे नियोजन केले आहे. त्यांना श्रीकांत देसले, माधव ठाकरे, नायब तहसीलदार के. के. काेठावदे, युवराज केदार, समाधान शिंदे, किरण कांबळे आदींनी सहकार्य केले.

जेलरोडवर वाहतूक बंद
नागरिकांना निकाल समजावा यासाठी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था असेल. मतमोजणीमुळे जेलराेड वाहतुकीसाठी बंद असेल.

बातम्या आणखी आहेत...