आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कारागृहात न्यायालय; दरमहा तिसऱ्या शनिवारी काम

गणेश सूर्यवंशी | धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ जामीन मिळत नाही म्हणून कारागृहात अडकून पडलेले व किमान तीन वर्षे शिक्षेच्या गुन्ह्यातील बंदिवानांचे खटले चालवण्यासाठी धुळे जिल्हा कारागृहात स्वतंत्र न्यायालय सुरू झाले आहे. इंग्रजांच्या कालखंडापासून सुमारे १६० वर्षांचा इतिहास असलेल्या या कारागृहात सुरू झालेल्या स्वतंत्र न्यायालयातून पहिल्याच दिवशी तिघांना जामीनही मिळाला. न्यायालयामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ होण्यासह पोलिस, न्यायालयावरील ताण कमी होईल.

धुळे जिल्हा कारागृहाचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात सन १८६२ मध्ये झाले होते. हे कारागृह राज्यातील सर्वात जुन्या कारागृहात गणले जाते. कारागृहात सद्य:स्थितीत ३११ बंदिवान आहे. त्यात तीन वर्षाच्या आत शिक्षा झालेले पण ज्यांच्या जामीनसाठी कोणीही आले नाही असे बंदिवान अर्थात कच्च्या कैद्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी आता स्वतंत्र कारागृह न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयात गंभीर गुन्हे वगळता केवळ ३ वर्षाआत ज्या बंदिवानांना शिक्षा झाली आहे त्यांच्या जामिनावर काम होणार आहे.

न्यायालय सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी तिघांना जामीन मंजूर झाला. महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पार्टटाइम न्यायालय सुरू असेल. त्यासाठी जिल्हा न्यायालयाने ठरवून दिलेले न्यायाधीश कामकाज पाहतील. त्यातही तिसऱ्या शनिवारी शासकीय सुटी आल्यास पुढील महिन्याच्या पहिल्या शनिवारी या न्यायालयाचे कामकाज होईल.

काय आहे १: ३ चे प्रमाण
कारागृहातील एका बंदिवानाला न्यायालयात नेण्यासाठी किमान तीन पोलिस कर्मचारी पोलिस मुख्यालयातून मागवले जातात. बऱ्याचवेळा अशा बंदिवानांची संख्या मोठी असते. त्यामुळे पोलिस मुख्यालयातून १: ३ प्रमाणात अधिक बंदोबस्त मागवला जातो. हे न्यायालय सुरू झाल्याने पोलिस बंदोबस्त मागवण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच वेळेसह बंदिवानांना न्यायालयात नेण्यासाठी इंधनावरील खर्च वाचेल.

कोणाला होईल फायदा ..
जुगार, चोरी, हाणामारी तसेच किरकोळ स्वरूपातील गुन्हा दाखल असलेल्या बंदिवानांना या न्यायालयाचा लाभ होणार आहे. या न्यायालयात मुख्य न्यायालयाप्रमाणे विटनेस बॉक्स, वकील, पक्षकारांसाठी सोय करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...