आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र सरस:यूपी, मध्य प्रदेश, गुजरातची दुर्दशा; सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची केंद्र सरकारवर टीका

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • असंघटितांनी एक मेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करा

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ऑक्सिजनची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसत आहे. यात केंद्र शासन अपयशी ठरले आहे, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला. केंद्राच्या तुलनेत राज्य शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्याने स्थिती नियंत्रणात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये स्थिती अतिशय गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेधा पाटकर बुधवारी शहरात आल्या हाेत्या. त्यांनी असंघटित कामगारांची भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकारने आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणाकडे लक्ष देणे आवश्यक होते. शासनाने बजेटची प्राथमिकता बदलत आरोग्य आणि शिक्षणासाठी अधिक निधीची तरतूद करण्याची गरज आहे. सातवा वेतन आयोग लागू केला. अधिकाऱ्यांचे वेतन वाढले. मात्र, रिक्त जागा भरण्याकडे लक्ष दिले नाही. राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक्स-रे मशीन बसवण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार आहे. राज्यात अंशत: लॉकडाऊनमुळे निर्माण होणारी उपासमार थांबवण्यासाठी शिवभोजन फायदेशीर ठरते आहे. मात्र, त्यापुढे जाऊन वसाहती आणि कॉलन्यांचा विचार करून कम्युनिटी किचनची व्यवस्था झाली पाहिजे. प्रत्येक रेशनकार्डवर १५ किलो धान्य मिळाले पाहिजे, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करण्यात यावी. असंघटित कामगारांची नोंदणी व्हावी असेही त्या म्हणाल्या.

असंघटितांनी एक मेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करा
असंघटित कामगारांची राज्यात नोंदणी झाली नाही. सरकारी कामगार कार्यालय सक्षम नाही. त्यामुळे शासनाने १ मे कामगार दिवसापासून व्यापक प्रमाणात असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी मोहीम हाती घ्यावी. त्यासाठी गावागावात, शहरात सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, शासकीय यंत्रणेची मदत घ्यावी. श्रमिक नोंदणी करण्यासाठी शासनाला साकडे घालण्यात येईल, असे मेधा पाटकर यांनी या वेळी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...